मातंग एकता अंदोलनच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी दिगंबर जोगदंड यांची निवड
- मातंग एकता अंदोलनच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी दिगंबर जोगदंड यांची निव
लोणी-काळभोर येथील दिगंबर जोगदंड यांची मातंग एकता अंदोलनच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व अविनाश बागवे यांच्या हस्ते देण्यात आले.
दिगंबर जोगदंड हे लोणी-काळभोर येथील मातंग समाजाचे तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आहेत .लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी पुणे ते मुंबई पायी पदयात्रा काढून पावसाळी अधिवेशनाचे लक्ष वेधणारा हा झुंजार कार्यकर्ता आहे तसेच पुणे येथे समाज कल्याण आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण केले होते तसेच समाजासाठी अहोरात्र काम करणारा न्यायनिवाडा करणारा हा कार्यकर्ता असून समाजामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिगंबर जोगदंड यांचे आहे. तसेच दिगंबर जोगदंड यांनी निवडीनंतर म्हणाले की मातंग समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले निवडीनंतर सांगितले.