ज्येष्ठ नागरिक संघ उपाध्यक्षपदी विलास जवळकर
सचिन माथेफोड,पुणे
Advertisement
ज्येष्ठ नागरिक संघ राष्ट्रवादी(शरद पवार) हवेली तालुका उपाध्यक्षपदी आळंदी म्हातोबा येथील विलास जवळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.वडगाव रासाई या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष गिरमकर,तालुका अध्यक्ष सुरेश कुंजीर,तालुका अध्यक्ष संदीप गोते,जिल्हा उपाध्यक्ष नानासो जवळकर,हवेली ता.संघटक संतोष भोंडवे,वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दगडे,औद्योगिक विभाग तालुका अध्यक्ष प्रशांत जवळकर,सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष महेश गायकवाड,पंचायत समिती माजी सदस्य अरविंद शिवरकर,वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष काकासाहेब माथेफोड,युवक सर चिटणीस संतोष वाल्हेकर उपस्थित होते.