संत निरंकारी भक्तांकडून १५९ युनिट रक्तदान
सचिन माथेफोड,पुणे.
आव्हाळवाडी, १५ सप्टेंबर २०२४ :
निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार, दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी संत निरंकारी मिशन पुणे झोन अंतर्गत आव्हाळवाडी सेक्टरच्या वतीने आव्हाळवाडी,मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन,केशवनगर, हिंगणगाव,वाडे बोल्हाई. यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, आव्हाळवाडी येथे १५९ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या मध्ये संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले १५९ युनिट यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी, (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून सदिच्छा भेट दिली.
मिशनच्या भक्तांसाठी निष्काम सेवा भावनेने केले जाणारे रक्तदान हे आधीपासूनच जनकल्याणाचे एक अभिन्न अंग बनून राहिले आहे . युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी यांचे कथन ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,नाल्यांमध्ये नको’ हा संदेश मिशनच्या अनुयायांनी निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅली चे आयोजन आव्हाळवाडी परिसरात केले होते.या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार दत्तात्रय सातव (आव्हाळवाडी सेक्टर प्रमुख) यांनी मानले. अवनीत तावरे (क्षेत्रीय संचालक, पुणे सीटी) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील आव्हाळवाडी सेक्टर चे संयोजक,मुखी,सेवादल , स्वयंसेवकांनी योगदान दिले.