हवेली मधील शिवसेनेतील (उबाठा) कडवट शिवसैनिकांना नवचेतना…….विधानसभेच्या तोंडावर हवेली तालुक्यातील शिवसेना आली ॲक्शन मोडवर
सचिन माथेफोड,पुणे
निवडणुकी च्या तोंडावर हवेली तालुका ठाकरे गटाची जंबो कार्यकारणी तयार झाल्याने पुन्हा एकदा वातावरण निर्मिती झाल्याचे पहायला मिळाले गेली अनेक वर्षे शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या निष्ठावान लोकांना संधी मिळाल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला व पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले.मागील काही वर्षांपासून शांत असलेली शिवसेना या भागात निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत रंग चढणार एवढे नक्की आहे.तसेच जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांना पदे मिळाल्याने काही अशी पारडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे झुकलेले दिसत असून आता हे हाडाचे शिवसैनिक दिलेली जबाबदारी घेऊन निवडणुकीत कशा पद्धतीने कार्यरत होतात हे पहाण्याजोगे ठरेल.तसेच काही जुन्या पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आलेली उदासीनता देखील यामुळे जाईल.अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डावलून नवीन तरुणांना संधी दिल्या मुळे हवेलीत सध्या आनंदाचे वातावरण आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हवेली तालुका नवनियुक्त कार्यकारणीची निवड उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख सचिन अहीर जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड यांच्या मार्गदर्शनखाली आज शिवसेना उ बा ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख युवराज दळवी व शिवसेना शिरूर हवेली विधानसभा संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी युवराज दळवी यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व पक्ष संघटना वाढीसाठी उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी ताकदीने उभे राहण्याचे आव्हान केले नवनियुक्त पदाधिकारी नाव व पद पुढील प्रमाणे हनुमंत सुरवसे (उपतालुका प्रमुख) गणेश धुमाळ (तालुका संघटक) अजय मोरे विभागप्रमुख (लोणी जि प)
संतोष खेंगरे उप विभागप्रमुख (लोणी जि प ) किरण थेऊरकर उप विभागप्रमुख (लोणी का जि प),शिवाजी ढवळे (तालुका सह संघटक) शाहजी बनकर विभागप्रमुख (उ कां जि प) शनैश्वर मेमाणे (उप विभागप्रमुख उ कां जि प )बाळासाहेब भोंडवे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष, तानाजी जाधव वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष,विष्णु नरके वाहतूक सेना तालुका संघटक, भाऊसाहेब कुंजीर शाखाप्रमुख कुंजीरवाडी, संतोष सयाजी कुंजीर उप शाखा प्रमुख कुंजीरवाडी यावेळी युवासेनेचे चंद्रकांत कुंजीर, सुमित सातव पाटील, विभाग प्रमुख राहुल पवार सुहास शिंदे बाप्पू गुंजाळ सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.