लोणी काळभोर पोलिसांची कार्यवाही….कोर्टातून पळालेल्या आरोपीस सापळा रचून अटक
टेंभुर्णी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 244 / 2024 भादवी कलम 376मधील आरोपी नामे शिवाजी महादेव पेटाडे वय 28 रा.उंबरे पागे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा बार्शी सेशन कोर्टातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता त्याबाबत बार्शी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 891/2024 बीएनएस कलम 262 नुसार दिनांक 21/ 10 /2024 रोजी दाखल असून सदर फरार आरोपी याचे बाबत गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून नमूद आरोपी यास आज दिनांक 01/11/ 2024 रोजी 22 /15 वाजता कुंजीरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतले असून सदर आरोपी ताब्यात घेतले बाबत टेंभुर्णी व बार्शी पोलीस स्टेशन चे तपासी अधिकारी यांना कळविण्यात आले असून नमूद आरोपी बार्शी पोलिस स्टेशन स्टाफ यांच्या ताब्यात देण्यात आला सदर कारवाई सहा पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार4510 विजय जाधव, पोशी राहुल कर्डिले, किशोर कुलकर्णी, spo संतोष गायकवाड, राहुल गायकवाड, सागर बोडरे, बापू घुले यांनी केलेली आहे.