मी समोरासमोर चर्चेला तयार – अशोक पवार
शिरूर प्रतिनिधी
Advertisement
शिरूर येथील घोडगंगा साखर कारखाना सत्तेत असताना विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या काळातच बंद पडलेला आहे असा आरोप दादा पाटील फराटे यांनी केल्यानंतर अशोक पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की अर्थ खात्याने केवळ मी त्या पक्षात गेलो नाही म्हणून आमच्या कारखान्याची फाईल अडवली मी जर त्या पक्षात असतो तर मला देखील मोठ्या प्रमाणात कर्ज मिळाले असते. कारखाना का व कसा बंद पडला याविषयी चर्चा करण्यासाठी समोरासमोर मी तयार आहे. दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणाले होते माझ्याशिवाय कारखाना कसा चालू होतो तो पाहू व आमचे नेते म्हणत आहेत की आपण कारखाना सुरू करू यावरून आपण समजून घ्यावे.