राजकीय

प्रदीप कंद यांच्या निवडणुकीतून माघारीमुळे शिरूर हवेलीत बदलणार निकाल


पुणे

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अशातच शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर विधानसभा २०२४ ला उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिरुर हवेलीच्या मैदानात भाजप उमेदवार प्रदिप कंद यांची ही तिस-यांदा माघार घेत असलेले दिसून येत आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी कडून प्रदीप कंद हे उमेदवारी रेस मध्ये होते परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे गेल्याने प्रदीप कंद यांची निराशा झाली होती. म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. हा उमेदवारी अर्ज कायम राहील अशी चर्चा शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होती. कारण या विधानसभेवर मोठ्या प्रमाणात राजकीय गणित अवलंबून होती व शिरूर हवेलीचा दावेदार कोण? याकडेही लक्ष लागले होते.

Advertisement

प्रदीप कंद हा एकमेव असा उमेदवार होता की तो अपक्ष उभे राहून निवडणुकीत चुरस आणू शकला असता. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपा वरिष्ठांनी शिरूर हवेलीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद उभे करण्याच्या बद्दल शब्द दिला आहे. व महायुतीमध्ये कुठलीही गटबाजी नको यामुळे वरिष्ठाच्या सांगण्यावरून मी माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतला आहे. तर महायुतीचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात काही मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदिप कंद यांनी वरिष्ठांना मैत्रीपूर्ण लढत करावी म्हणून ते प्रयत्नशील होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांची समजूत काढून आपला अर्ज माघारी घेण्याची सूचना आज फोनवर बोलून दिल्याने प्रदिप कंप यांनी पक्षाचे महत्त्वाचे सहका-यांशी चर्चा करुन अर्ज माघारी घेण्याचे ठरवले.यावेळी पै.संदीप उत्तमराव भोंडवे बोलताना म्हणाले की,विधानसभा निवडणुकीचा फॉर्म मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपा शिरुर विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करुन मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रदीप दादांच्या या निर्णयास विधानसभा संयोजक,शिरुर भाजपा अध्यक्ष, हवेली भाजपा अध्यक्ष, युवा मोर्चा,महिला मोर्चा, विविध आघाड्या व शिरूर हवेली मधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांचा पाठींबा होता. तसेच जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी (दि. २ नोव्हेंबर) प्रदीपदादा कंद यांच्या समवेत शिरूर-हवेलीच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्या सोबत अतिशय

सकारात्मक चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनीकलेल्या सूचनेनंतर प्रदीपदादा कंद यांनी फॉर्म मागेघेण्याचा निर्णय घेतला आहे. शिरूर – हवेली मधीलभाजपाची एकी अंखडीत राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनीआजपर्यंत प्रदीपदादांना साथ दिली, त्यांचे मी मनपूर्वकआभार व्यक्त करतो, असे भोंडवे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!