राजकीय

तळेगाव ढमढेरे ॲड.अशोक पवार यांच्या निषेधार्थ मनगटावर चुना लावून शेतकऱ्यांची बोंबाबोंब..


तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे ॲड.अशोक पवार यांची प्रचार सभेदरम्यान बॅनर हातात धरत प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवल्याच्या व ८० वर्षांचे ज्येष्ठ शेतकरी व नेते अरविंद ढमढेरे यांनी उसाचे टिपरू सभेत दाखवत असताना पोलीस बळाचा वापर करत सभेच्या बाहेर काढल्याने तळेगाव ढमढेरे येथील शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांचा निषेध मनगटावर चुना लावून बोंबाबोंब करत या अमादरांच करायचं काय ? खाली डोके वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

याबाबत महेश ढमढेरे यांनी ज्येष्ठ शेतकरी व कारखान्याचे सभासद यांनी ॲड.अशोक पवार यांना या उसाचे करायचे काय ? कारखाना बंद,कामगार देशोधडीला लागलाय असे प्रश्न विचारल्यावर त्यांना सभेतून बाजूला करण्यात आले हे दिवट्या आमदाराला शोभते का ? असा प्रश्न उपस्थित करून ॲड.पवार यांच्या नावाने मनगटावर चुना लावून बोंबाबोंब करण्यात आली.

Advertisement

तळेगाव ढमढेरे येथील शेतकऱ्यांनी कर्ज सम्राटांच्या करामती, शेळी बाजार गावातून बाहेर काढत बारा बलुते दारांच्या पोटावर पाय देणाऱ्याला मतदान करायचे का ?, ज्यांनी घोड गंगा कारखाना बंद पाडला त्यांना मतदान करायचे का?, पुनर्वसन शेरा कमी करण्याचे हजार दाखवून दोन वेळा आमदार झाला परत आमदार करायचा का ? , आजोबा गेले ,वडील गेले वारसनोंद नाही स्वतःचा मुलगा सभासद होऊन चेअरमन होतो कसा ?, अशा आशयाचे फलक झळकवल्याने आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा चुकीचा वापर करत शेतकऱ्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवले असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!