महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागीय मंडळावर विकास जगताप यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागीय मंडळावर शालेय शिक्षण मंत्री आदेशानुसार, नामनिर्देशित माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापकीय संस्थांच्या प्रतिनिधींमधून विकासदादा शिवराम जगताप यांची संचालक म्हणून निवड झाली आहे.
पुणे विभागाची कार्यकारी समिती ही कार्यकारी, आर्थिक आणि प्रशासकीय कार्यपद्धतीं बाबत नियम आणि कायदे तयार करण्यासाठी, आवश्यक असल्यास सुधारणा करण्यासाठी आणि इतर बाबींबाबत कर्तव्य पार पाडण्यासाठी निवडण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते मधील महत्त्वाचा टप्पा मानला जातात. या परीक्षा घेणार्या मंडळावर गेल्या अनेक वर्ष अशासकीय सदस्य नेमले गेले नव्हते. या अशासकीय सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा योग्य रीतीने संपन्न होणे शक्य होते. या परीक्षेची गुणवत्ता, गोपनीयता व विश्वासार्हता वाढवण्यासाठी या संचालकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व संस्था चालकांना या परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक असणाऱ्या सुविधा श्री विकास जगताप हे ग्रामीण भागातील खंबेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव असल्यामुळे या प्रश्नांना ते आता मंडळाच्या बैठकीमध्ये वाचा फोडतील आणि ग्रामीण संस्था चालकांचाही आवाज बोर्डाच्या बैठकांमध्ये आता दणाणेल असा विश्वास खंबेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ श्रीपाद ढेकणे सर, चेअरमन माणिकराव नागवडे, संस्थेचे संचालक उद्धव ढोले, ॲड राजेंद्र तांबे, शंकर नागवडे, लक्ष्मण भालसिंग, मुख्याध्यापक प्रकाश दौंड सर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय संचालक पदी श्री विकास जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल परिसरातील अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.