राजकीय

शिरूर हवेलीत मतदानाचा टक्का वाढला……. पोस्टल मतदान मोजणी अजून बाकी


लोणी काळभोर प्रतिनिधी – शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत एक दोन प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले यावेळी मतदारांनी केलेल्या मतदानामुळे उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीत काट्याची टक्कर झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार अशोक पवार हे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून माऊली कटके हे उमेदवार समोरासमोर उभे होते यावेळी दोन्ही उमेदवारांनी न भूतो न भविष्यती अशी ताकद लावून निवडणुकीत रंगत आणली. आज मतदानाच्या वेळी वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या पोलिंग एंजटला दमदाटी केल्यामुळे आमदार अशोक पवार आक्रमक झाले होते . पुर्व हवेलीत मतदान शांततेत पार पडले असुन संध्याकाळी सात वाजले तरी अनेक ठिकाणी मतदान चालले होते .यावेळी सर्व मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढली असून याचा फायदा आमदार अशोक पवार यांना होणार की माऊली आबा कटके यांना होणार हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला मतदारांनी केलेले मतदान बंद पेटीतून बाहेर पडल्यानंतरच कळेल .तसेच यामध्ये अजून पोस्टल मतदान जमा करणे बाकी असून धुरंधर लोकांना देखील निकालाचा अंदाज अजून घेता आला नाही.त्यामुळे उमेदवारांची धााकधूक वाढलेली असून आता या दोन दिवसांमध्ये सर्व कार्यकर्ते गोळा बेरीज करताना दिसणार आहेत.

Advertisement

गांवांची आकडेवारी पुढील प्रमाणे 

उरुळी कांचन-60.29%

 लोणी काळभोर 66 %

सोरतापवाडी -67.82%

कुंजीरवाडी – 73.46%

कोरेगाव मूळ – 65.78%

तरडे -80.28 

नायगाव -80 .56%

पेठ- 79%

 थेऊर – – 68.50%

कदमवाकवस्ती – चालू आहे 

 वळती -70 .20 %

शिंदवणे -73.37%

आळंदी म्हातोबाची – 72.27%

टिळेकर वाडी- 70% 

वाघोली – 58.20%

हिंगणगाव -80.48%

भवरापुर – 81%

 केसनंद -73.37%

आष्टापूर 76%

खामगाव टेक 75.42%


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!