निकाला आधीच ‘आमदार’ नावाची पाटी चर्चेत
पुणे प्रतिनिधी
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाची निवडणूक नेहमीपेक्षा यावेळी अधिक चर्चेत राहिली.एकीकडे विद्यमान आमदार अशोक पवार तर दुसरीकडे अल्पावधीतच तरुणांचा चेहरा बनणारे ज्ञानेश्वर कटके.दोन्ही बाजूंनी हायटेक प्रचार तसेच आरोप प्रत्यारोप व वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे मतदारसंघात संघात एक चुरस पाहण्यास मिळाली.उद्या दिनांक २३ रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्या अगोदरच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये सोशल वार पाहायला मिळत असून आपलाच नेता कसा निवडून येईल याबाबत आपापली बाजू मांडताना कार्यकर्ते दिसत आहेत.गावोगावी अनेक तरुणांनी पैंज लावल्या असून अनेकांनी मात्र निकाला अगोदरच आपल्या उमेदवाराला आमदार म्हणून घोषित केलेले आहे.यानुसार अनेक व्हॉट्सअँप ग्रुप वर तसेच स्टेटस वर मा.श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आमदार शिरूर हवेली अशी नावाची पाटी फिरताना दिसत असून काही ग्रुप मध्ये तर आमदार झाल्यानंतर जी शप्पथ घेतली जाते ती शप्पथ ज्ञानेश्वर कटके यांच्या नावाने उत्साहित कार्यकर्ते व्हायरल करताना दिसत असून निकाल लागल्यानंतर कशा पद्धतीचे वातावरण मतदार संघात असेल हे पहाण्याजोगे ठरणार असून तरुणांमध्ये आत्तापासूनच जल्लोषाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.