आळंदी म्हातोबा येथील कार्यकर्त्यांची आमदारांना अनोखी भेट
सचिन माथेफोड
Advertisement
शिरूर हवेली मतदार संघातून निवानिर्वाचीत आमदार माऊली आबा कटके यांची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय झालेला असून निकाल लागल्यानंतर मागील दोन दिवसांपासून त्यांना वाघोली येथे भेटण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा रांगा लागलेल्या दिसत आहे.अशातच आळंदी म्हातोबा येथील कार्यकर्ते गणेश जवळकर,शंकर जवळकर याठिकाणी आपल्या नेत्याला भेटायला गेले असता त्यांनी दिलेली भेट उपस्थित लोकांमधे चर्चेचा विषय ठरला.मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आपल्या आमदाराला नजर लागू नये म्हणून त्यांनी पुष्प गुच्छाला काळी बाहुली बांधून दिली. हे चित्र पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.यावेळी पंचक्रोशीतील अनेक नेते मंडळी तसेच माजी सभापती प्रकाश दादा जगताप उद्योजक भरत जवळकर उपस्थित होते.