क्राईम

शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारून खुनाचा प्रयत्न – अल्पवयीनांविरुद्ध गु्न्हा


नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीनांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Advertisement

याबाबत मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहायला आहे. मुलाने शाळेतील एका मुलीबाबत अपशब्द उच्चारल्याने अल्पवयीन मुले चिडली होती. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तो शाळेत निघाल होता. टिळेकरनगर परिसरातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीनांनी मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. एकाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करुन अल्पवयीन पसार झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!