कुंजीरवाडी येथे प्रशिक्षण शिबिराची सांगता
सचिन माथेफोड
Advertisement
इन्स्पायर कराटे मर्दानी आखाडा व स्वप्नील कुंजीर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानने कुंजीरवाडी व परिसरातील मुला मुलींसाठी शिव कालीन मर्दानी खेळ व कराटे प्रशिक्षण पंधरा दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन कुंजीरवाडी येथे करण्यात आले होते. त्याचा सांगता समारंभ सहभागी मुलांना प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या शिबिर कालावधीत प्रशिक्षक म्हणून ओंकार लोखंडे निलेश माने शुभम कोरडे यांनी मुलांना विविध खेळ व धडे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना स्वप्नील कुंजीर यांनी मुलांना उद्याच्या बलशाली हिंदुस्थानसाठी तुम्हाला बलशाली होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास नंदकुमार कुंजीर,चंद्रकांत कुंजीर, रणजीत कुंजीर, हर्षवर्धन कुंजीर प्रशिक्षक ओंकार लोखंडे सह मान्यवर उपस्थित होते