आमदार माऊली कटके यांची केली पेढ्यांची तुला
लोणी काळभोर – शिरूर हवेली विधानसभे मध्ये माऊली कटके यांची भरघोस मतांनी आमदारपदी निवड झाली. मतदारसंघाचे आभार मानण्यासाठी आमदार माऊली कटके यांनी पूर्व हवेलीतील अनेक गावात आभार घेण्यात आला . यावेळी थेऊर , नायगाव ,पेठ , कोरेगावमुळ , भावरापूर ,टिळेकरवाडी खामगाव ,उरुळी कांचन इत्यादी गावात आभार दौरा केला . थेऊर येथे आमदार माऊली कटके यांच्या हस्ते चिंतामणी मंदिरात गणपतीची आरती करण्यात आली.
नायगावचे सरपंच अश्विनी चौधरी व पेठगावच्या सरपंच शोभा चौधरी यांच्या हस्ते माऊली कटके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी , माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी , आदर्श सरपंच गणेश चौधरी , आदर्श सरपंच सुरज चौधरी ,सुजित चौधरी , युवा नेते ऋषीराज चौधरी ,संतोष हगवणे , यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप ,यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, विजय चौधरी ,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)युवा जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक आदी उपस्थित होते .
नायगाव ,पेठ व प्रयागधाम या गावांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांची नायगाव येथील काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी पेढ्यांची तुळा करण्यात आली . यावेळी आमदार माऊली कटके यांनी सांगितले की
हवेली तालुक्याने आपल्या या भुमीपुत्राला विधानसभे मध्ये पाठविण्याचे काम केले असुन खऱ्या अर्थाने नायगावाने टक्के वारी मध्ये एक नंबरचे मतदान दिले असल्याचे आमदार माऊली कटके यांनी सांगितले .
गावोगावी आमदार माऊली कटके यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .