ताज्या घडामोडी

आमदार झाले शांतता दूत……दंगल सदृश्य परिस्थिती हाताळली नेटाने


शिरूर शहर बंद अखेर मिटला
काल रविवार दिनांक ०२/११/२०२४ रोजी शिरूर शहरातील राम आळी मधील श्रीराम मंदिरामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मांसाहारी अन्न खाऊन त्या ठिकाणी तसेच टाकून दिले सदर घटना काही श्रीराम भक्तांच्या निदर्शनास आली आणि शिरूर शहरांमध्ये त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामध्ये सकल हिंदू समाज तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,बजरंग सेना लहुजी सेना श्रीराम सेना या संघटनांचा कार्यकर्त्यांनी ताबडतोब या गोष्टीचा निषेध करून शिरूर शहर बंदची हाक दिली आणि शिरूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले ही बातमी उशिरा रात्री शिरूर हवेली चे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना दूरध्वनी वरून समजली दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज माऊली आबांचा शिरूर शहर व पंचक्रोषीमध्ये आभाराचा दौरा होता तो त्वरित रद्द करून माऊली आबा तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरांमध्ये आले व शहरातील कार्यकर्त्यांना राम मंदिरात भेट देऊन त्या ठिकाणी बंदची हाक देणाऱ्या कार्यकर्त्यांना व तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शिरूर शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची विनंती करून जे कोणी ही निंदनीय गोष्ट केली आहे त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदारांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आणि आमदारांच्या आवाहनाला संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अखेर बंद मिटवण्यात आला व स्वतः सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूरच्या बाजारपेठेत फिरून सर्व व्यापारी वर्गाला त्या ठिकाणी आप आपली दुकाने उघडण्यास सांगितले आमदार माऊली आबा कटके यांनी सदर गोष्टीची तातडीने दखल घेतल्यामुळे व शिरूर शहरातील आमदारांच्या आव्हानामुळे तणावाचे वातावरण काही तासात निवळले व व्यापारी वर्गात व शिरूर शहरात सर्व नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त करून आमदारांना धन्यवाद दिले.

Advertisement

 

काल दिनांक ०२ डिसेंबर सोमवार रोजी श्री राम मंदिर राम आळी शिरूर मध्ये झालेल्या प्रकाराबाबत  विश्व हिंदु परिषद, बजरंग दल शिरुर प्रखंड,सकल हिंदू समाज शिरूर शहर यांच्या वतीने आज दिनांक ०३डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी जो बंद पुकारण्यात आला होता तो नवनिर्वाचित आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व शिरूर पोलिस प्रशासनाच्या आश्वासना नंतर मागे घेऊन माऊली आबा कटके यांच्या हातून व्यापाऱ्यांची दुकाने उघडण्यात आली व बंद शांती पूर्व मार्गाने मागे घेण्यात आला. तरी शिरूर बंद मध्ये सहभागी झालेल्या सर्व शिरूर शहर वासीय, व्यापारी बंधु, पोलिस प्रशासन व सकल हिंदु समाजाचे आभार मानण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!