हवेली तालुका शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात ….
हवेली तालुका शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात …
पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आयोजित, हवेली तालुका शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे अतिशय उत्साहात पार पडल्या.
नवीन शैक्षणिक धोरणा नुसार विद्यार्थी सर्वांगीण विकासा बरोबरच शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी व शिक्षकांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने या स्पर्धेचे आयोजन केलेले होते.
या वेळी विविध प्रकारच्या सोळा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत हवेली तालुक्यातील विविध बीटमधुन तालुका स्तरावर आलेल्या प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून झाले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हवेलीचे गटशिक्षणाधिकारी श्री ज्ञानदेव खोसे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक व माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य श्री. महादेव कांचन उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी हवेलीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेंद्र जगताप साहेब, श्री भरत इंदलकर साहेब, श्री शंकर मुंढे साहेब, सौ राधा पाचपुते मॅडम, प्राचार्य श्री. भोसले सर व हवेली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षकांना हवेली शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन शिंदवणे केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री. चिंतामण अद्वैत व केंद्र समन्वयक सौ. सारिका ताटे यांनी केले. तर संपूर्ण स्पर्धेचे संचलन श्री. युवराज ताटे यांनी केले.