वाघोली येथे शेतकरी ते थेट ग्राहक शेती माल विक्री
सचिन माथेफोड
वाघोली बकोरी रोडवरील निओ सिटी याठिकाणी अनिल भाऊ सातव पाटील यांचा संकल्पनेतुन विंग्रो फार्मर प्रोड्युसर कं आयोजित शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार विक्री चे आयोजन करण्यात आले होते.
Advertisement
आज सौ. मनिषाताई माऊली आबा कटके, श्री अनंता भाऊ कटके, श्री.संपत आबा गाडे , श्री.पिंटू भाऊ कटके तसेच श्री.सुनील चाचा जाधवराव ,गजानन आण्णा हरगुडे ,सुरज गाडे ,जीवन जाधवराव ,आबा दातार व बकोरी रोडवरील निओ सिटी सोसायटीचे सर्व चेअरम नागरिक यांच्या हस्ते उदघाटन करून मार्केटची सुरवात करण्यात आली.
वाघोलीमधील नागरिकांना दैनंदिन वापरातील गोष्टी स्वच्छ, ताज्या, सेंद्रिय स्वरूपात व रास्त दरात मिळाव्यात हा यामागील मुख्य उद्देश आहे. तरी नागरिकांनी दर शनिवारी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने अवश्य लाभ घेतला.