आमदारांच्या मामांची अपहरण करून हत्या
सतिश वाघ यांचे अपहरण करुन हत्या
लोणी काळभोर – विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहऱण करुन हत्या करण्यात आली आहे . पोलीस पुढील तपास करत आहेत .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी सतिश वाघ यांचे अपहरण केले होते .त्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवली होती . त्यानंतर संध्याकाळी उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.
आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथं अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवले .
सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केल्याची तक्रार सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली होती .
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास पथके रवाना केली होती .सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेनं नेले असल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसांना दिली होती . संध्याकाळी सतिश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडल्यामुळे हडपसर ,शेवाळेवाडी परिसरात खळबळ उडाली .पोलीसांचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले .