काळजी करू नका काहीही होऊ द्या सर्वात पुढे मी असेल…..अनिल सातव
सचिन माथेफोड
एअरफोर्सच्या जमीनीचा वॉलकंपाऊंटपासून १०० मीटर डिफेन्स झोन (नॉन डेव्हलप झोन) एरिया आहे. वाघोली हे गांव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे एअरफोर्सच्या वतीने पुणे मनपा (टाऊन प्लॅनिंग) यांनी १०० मीटरमधील येणारे प्लॉट व त्यावरील बांधकामाचा सर्व्हे करण्यास कोर्टाने आदेश देण्यात आले होते. तसेच एअरफोर्सच्या सर्व ठिकाणीच्या भिंतीवर नोटीसचे सुचना फलक लिहीण्यात आले आहेत. भिंतीच्या १०० मिटरच्या आत कोणत्याही बांधकामास परवानगी नाही. असा त्या भिंतीवरील नोटीसमध्ये उल्लेख केलेला आहे. वाघोली येथील साईसत्यम खांदवेनगर मधील कोलते पार्क ,जीनियस पार्क ,कावडे वस्ती मधील नागरिकांनी आपली आयुष्याची कमाई लावून येथे आपल्या स्वप्नातील घर बांधून राहत असताना जर अश्या प्रकारची नोटीस आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली परंतु आज या परिसरातील सर्व नागरिकांची मिटिंग घेऊन तुम्ही एकटे नाही नवनिर्वाचित आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके मी अनिल दिलीप सातव पाटील तसेच आम्ही सर्व सहकारी यात अनंता भाऊ कटके ,उपसरपंच समीर आबा भाडळे ,सुनील चाचा जाधवराव,सागर भाऊ गोरे ,केतनदादा जाधव हे तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले तसेच या संदर्भात आम्ही स्वखर्चाने वकिलांची नेमणूक करून सर्व शासन स्तरावर पाठपुरावा करू व यावर लवकरच तोडगा काढू असे सुद्धा आश्वासन दिले.