कुंजीरवाडी येथे evm विरोधात आंदोलन
सचिन माथेफोड
कुंजीरवाडी येथे evm विरोधात आंदोलन करण्यात आले कुंजीरवाडी येथे आज शरद पवार यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधत लोकशाहीचा जागर करत आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला जेष्ठ नागरिक संघ व मविआ च्या वतीने गावात evm विरोधात जनजागृती रैली काढण्यात आली गांव मंदिरा समोर जमत सर्व ग्रामस्थांनी evm च्या विरोधात निषेधा च्या घोषणा दिल्या यावेळी शिवसेना ठाकरे गटा चे स्वप्नील कुंजीर यांनी आपल्या भाषणात भाजप वर जोरदार हल्ला चढवला व evm विरोधात देशभर तीव्र आंदोलन होतील त्यात सहभागी होण्याचे आव्हान केले तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास धुमाळ यांनी लोकशाही ची गळचेपी सरकार करत असल्याचे सांगितले कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरिक संघ हवेली तालुका अध्यक्ष सुरेश कुंजीर लक्ष्मण कुंजीर नाना कुंजीर बबन कुंजीर दिलीप कुंजीर बबन खानेकर विलास वामने नंदू कुंजीर दत्तात्रय कुंजीर सह शेकडो जण उपस्थित होते सूत्रसंचालन विकास धुमाळ यांनी केले तर आभार स्वप्नील कुंजीर यांनी मानले.