जमीन व्यवहारात अडकले अधिकारी , बडे पत्रकार देखील लागणार गळाला.
पुणे
Advertisement
अनधिकृत जमीन विक्री तसेच लेटीकेशन जमिनीच्या एका प्रकारात अधिकारी तसेच कथित प्रसिद्ध पत्रकार यांची नावे आल्याने एकच खळबळ उडाली असून थोड्याच दिवसात संबंधितांवर रीतसर गुन्हे दाखल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.यामध्ये कथित पत्रकारांची नावे आल्याने लोकशाहीचा स्तंभच डळमळीत झाल्याचे बोलले जात आहे.कथित गुन्हेगार टोळी देखील या जमिनीच्या व्यवहारात सहभागी असल्याने आता नेमका कोणाचा बळी जाणार कोण सुटणार आणि कोण अडकणार हे चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.