वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करून अस्थीचे विसर्जन..
सचिन माथेफोड
कुंजीरवाडी गावचे प्रगतशील बागायतदार.. कै. पांडुरंग नानासो धुमाळ ऊर्फ बापू यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.. प्रयोगशील शेतकरी म्हणून बापूंची पंचक्रोशीत ख्याती होती.. ऊस लागवड, पालेभाज्या बरोबरच, फळ शेती व रेशीम शेतीचे प्रयोग त्यांनी आपल्या शेतात राबविले.. शेतीत रमणाऱ्या आपल्या वडिलांच्या स्मृती जपण्याचा निर्णय उच्चशिक्षित मुलांनी घेतला. त्यांचा मोठा मुलगा गणेश हा विशे कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी असून लहान मुलगा निलेश हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. अस्थीचे पाण्यात विसर्जन केल्याने होणाऱ्या जलप्रदूषणामुळे अनेक साथीचे आजार होत असल्याने अस्थीचे पाण्यात विसर्जन न करता आपल्यासाठी आयुष्यभर शेतीत राबणाऱ्या आपल्या वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी वडिलांच्या अस्थीचे शेतात विसर्जन करून त्यावर एक आंब्याचे झाड लावण्यात आले..
मार्केटयार्ड येथील प्रसिद्ध आडतदार शिवाजी धुमाळ व प्रगतशील बागायतदार शहाजी धुमाळ यांचे ते बंधू असून प्रसिद्ध उद्योजक अविनाश धुमाळ यांचे चुलते होते.
धुमाळ कुटुंबियांकडून राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे..