सामाजिक

आळंदी म्हातोबा ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम


सचिन माथेफोड,पुणे

Advertisement

 पुणे सोलापूर महामार्ग लगत असणाऱ्या आळंदी म्हातोबा या गावाची अनेक गोष्टींसाठी नेहमीच चर्चा असते परंतु सध्या राबवलेल्या नवीन उपक्रमामुळे ग्रामपंचायत चर्चेचा विषय बनलेली आहे. येथील ग्रामपंचायत देशात कामकाजाची सुरुवात मागील एका वर्षापासून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांचे आरती करून सुरू केले जाते. आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित ग्रामस्थांच्या समोर ग्रामपंचायत तिचे सदस्य पारस वाल्हेकर यांनी याची माहिती दिली. मागील वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा तसेच राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा स्थापन करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर प्रत्येक सदस्य सरपंच उपसरपंच सदरील प्रतिमेला वंदन करूनच आपल्या ग्रामपंचायतीच्या कामाला सुरुवात करतात. सदरील स्तुत्य उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीने सुरू करावा अशी माहिती मा. उपसरपंच शंकर जवळकर यांनी दिली व त्याला दुजोरा सदस्य दयानंद शिवरकर यांनी दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!