लोकमंगल पतसंस्थेच्या सल्लागारपदी सचिन सुंबे यांची निवड
सचिन माथेफोड
लोणी काळभोर – सोलापूर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी काळभोर शाखेच्या सल्लागारपदी पत्रकार सचिन लक्ष्मण सुंबे यांची निवड करण्यात आली. तसे निवडीचे पत्र शाखाधिकारी मारुती चौगुले यांनी त्यांना दिले. सचिन सुंबे यांच्या बरोबर तुषार काळभोर , भास्कर शेलार ,दत्तात्रय कुंभार , मनोज गायकवाड , ज्ञानेश्वर बिराजदार , रोहन सपकाळ ,उदय काळभोर , अनिल कांबळे , शिवाजी किलकिले , संदीप बोडके ,नितीन गाढवे व बाळू पाटील यांची निवड करण्यात आली . यावेळी सल्लागारांना नियुक्तीपत्रक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला . पत्रकार दिनाचे औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक शिवाजी माळी, विभागीय अधिकारी कमलाकर पाटील, शाखाधिकारी मारुती चौगुले व सल्लागार उपस्थित होते . लोकमंगल पतसंस्थेने आमदार व संस्थापक /अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भरारी घेतली असून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था आहे . पतसंस्थे मध्ये १२०० कोटींच्या ठेवी असून ९०० कोटीचें कर्ज वाटप केले आहे .संस्थेने अनेक योजना अमलांत आणल्या असून त्यामध्ये लखपती ठेव , धनवृद्धी ठेव , लोकमंगल सुकन्या ठेव ,त्रैवार्षिक ठेव योजना अशा योजनांमुळे लोकमंगल पतसंस्था महाराष्ट्रात नावारुपाला आली आहे अशी माहिती संचालक शिवाजी माळी यांनी यावेळी दिली .
सचिन सुंबे यांच्या निवडीमुळे परिसरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे .