शिक्षकांच्या पगारातील एक टक्का कपात खाजगी संस्था चालकांचा अजब न्याय शिक्षकांची कोट्यावधींची फसवणूक…निवृत्त शिक्षकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागितली दाद
सचिन माथेफोड,पुणे
पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील श्री शंभू देवस्थान ट्रस्ट संचालित असणाऱ्या शिक्षण संस्थांतील शाळेमधील शिक्षकांकडून प्रती महिना पगारातील एक टक्के रक्कम कपात होत असून याबाबत शिक्षक अनभिज्ञ आहेत.
मागील अनेक दिवसांपासून या संस्थेचे आर्थिक घोटाळे top 7 न्यूज ने समोर आणलेले असून मागील वर्षी अनधिकृत शाळा असूनही पालकांचे लाखो रुपये फी च्या नावाखाली सदरील शाळा वसूल करत आहे ही बाब निदर्शनास आणून देताच संस्थेने लाखो रुपये पालकांचे परत देण्याची वेळ आली होती.आता या संस्था चालकांनी पालकांचीच नव्हे तर तिथे इमाने इतबारे शिकवणाऱ्या अनुदानित दीडशे शिक्षकांची देखील फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे.मागील अनेक वर्षांपासून या संस्थेचे चालक तेथील शिक्षकांच्या पगारातील एक टक्के रक्कम कापून घेत असून याबाबत शिक्षकांना कसलीही पावती देत नाही तसेच निवृत्त झाल्यानंतर परतावा देखील देत नाही सोबतच याबाबत कोणत्याही शिक्षकाची संमती संस्था चालकांनी शिक्षकांकडून घेतलेली नाही. या पैशांचे नेमके ते काय करत आहेत याची देखील माहिती त्यांना देत नसून संस्थेमध्ये अनेक आर्थिक घोटाळे होत असून प्रशासन योग्य रित्या चालवले जात नाही याबाबत चौकशी व्हावी म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना अर्ज दिलेले आहेत.यामध्ये अनिल महादेव कामठे, एम एम अशा विविध शिक्षकांनी तसेच ग्रामस्थ विशाल हरपळे यांनी अर्ज केलेला आहे.