पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या रणरागिनी डॉ. वनिता रतन काळभोर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीवर भैरवगडावर केले ध्वजारोहण
सचिन माथेफोड
महाराष्ट्रातील सर्वात खडतर अशा समजल्या जाणाऱ्या ट्रेकमधील *मोरोशीचा भैरवगड* हा एक आहे , गडाची उंची समुद्रसपाटीपासून 3656 फूट आहे.
या ट्रेकमध्ये तीव्र स्वरूपाचे चढण(climbing )चढावे लागते , तसेच रॅपलिंग म्हणजे फक्त दोरखंडाच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो, एवढ्या उंचीवर हे सर्व करत असताना आपल्या सहनशक्तीचा कसच लागतो. चहू बाजूने घोंघावणारा जोराचा वारा, निमुळती पायवाट, हाताने धरण्यास जागा नसणे,दगडाकडे तोंड करून पुढे जाण्यासाठी कशीबशी जागा शोधणे, वरून दगड- माती ढासळत असताना स्वसंरक्षण करत चढणे अशा प्रकारच्या संकटावर मात करत डॉक्टरांनी हा ट्रेक पूर्ण केला. पूर्वीच्या काळी महाराजांनी शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ‘टेहळणी’ स्वरूपात याचा उपयोग करून घेतला , एव्हढ्या उंचीवर येथे पाण्याच्या दोन टाक्या आहेत.
‘सह्याद्री संजीवनी’ या संस्थेमार्फत दिनांक 26-1-25 रोजी पूर्ण भारतभरातील पंधरा ते वीस गिर्यारोहकांनी या मोहिमेत भाग घेतला होता. यातच डॉ. वनिता काळभोर यांनी भारताचा ध्वज फडकावत मोहीम फत्ते करून पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या मानाच्या तुऱ्यात अजून एक तुरा जमा केला याबद्दल डॉ. वनिता रतन काळभोर यांचे हार्दिक अभिनंदन.