सामाजिक

शेवटच्या षटकात हृदयाचा ठोका चुकवणारा सामना; डब्लू सी सी संघाचा थरारक विजय


लोणी काळभोर प्रतिनिधी – ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना संधी मिळाली, तर भविष्यात मोठे खेळाडू घडू शकतात. त्यामुळे अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे, असे मत शासननियुक्त नगरसेवक अजित घुले यांनी व्यक्त केले. स्टार इलेव्हनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या सामन्यात डब्लू सी सी वेअरहाऊस संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.

ही चार दिवस चाललेली स्पर्धा अत्यंत रोमांचक ठरली. चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. अंतिम सामन्यात डब्लू सी सी वेअरहाऊस आणि यंग फायटर यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना यंग फायटर संघाने ८ षटकांत ८० धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात डब्लू सी सी संघाने धावांचा पाठलाग करताना दमछाक केली. शेवटच्या दोन धावांसाठी पाच विकेट्स गमावल्याने सामना हातातून निसटतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

यंग फायटर संघाच्या अनिकेत भोसले याने भेदक माऱ्याने पाच विकेट्स घेत डब्लू सी सीच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मात्र, डब्लू सी सी संघाच्या प्रेम टेमगिरे याने शानदार अर्धशतक झळकावत विजयाची संधी निर्माण केली. शेवटच्या षटकात एक धाव, एक विकेट आणि दोन चेंडू शिल्लक असताना हजारो प्रेक्षकांचे डोळे बॉलर आणि बॅट्समनवर खिळले होते. अखेर, एक चेंडू राखून डब्लू सी सी संघाने नाट्यमय विजय साजरा केला.

विजेत्यांचा गौरव
प्रथम पारितोषिक अजित घुले, द्वितीय पारितोषिक अशोक डोके आणि घनश्याम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरज भापकर, मयूर शिंदे, राजेश एठेकर, राहुल परभणे, निखिल बडेकर, अभिजित जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धेतील विशेष पुरस्कार:

मॅन ऑफ द सिरीज: धीरज संभाळे
मॅन ऑफ द मॅच: प्रेम टेमगिरे
बेस्ट बॉलर: सुनील चव्हाण
बेस्ट बॅट्समन: धीरज संभाळे
या स्पर्धेच्या आयोजनासाठी सचिन सुंबे, सतिश जवळकर, विजय बोराटे, अमोल राऊत, रोहन खांदवे, हंसराज पाटील, राजकुमार पाटील, योगेश चव्हाण, मंथन बारवकर, महावीर जाधव, हेमंत काळभोर, ऋषिकेश जाधव, वैभव गुरव, मंगेश सकट, प्रितम पवळ, प्रतिक खळदकर, सिद्धांत आवटे, आकाश आवटे यांनी विशेष योगदान दिले. तसेच, या स्पर्धेसाठी आशुतोष घुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!