उरुळी कांचन वाहतूक व्यवस्थेबाबत विकास जगताप यांचे सूचक विधान
उरुळी कांचन वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा नेहमीच उडालेला पाहण्यास मिळत आहे.वेळोवेळी याबाबत स्थानिक प्रशासनाने अनेक उपाय योजना केलेल्या आहेत.त्याच पद्धतीने आता देखील स्थानिक पोलीस प्रशासनाने याबाबत नकाशा बनविलेला असून त्याबाबत विकास जगताप यांनी आपल्या सूचना मांडल्या आहेत
उरुळी कांचन सारख्या झपाट्याच्या वेगाने वाढणाऱ्या गावांमध्ये वाहतुकीसाठी क्रॉसिंग, एंट्रन्स किंवा एक्झिट साठी किमान दोन-तीन पर्यायी व्यवस्था असणे आवश्यकच होते. प्रस्तावित वाहतूक नकाशा प्रमाणे गावाच्या पूर्व पश्चिम बाजूस आणि मध्यवर्ती ठिकाणी क्रॉसिंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांना तात्पुरती (उड्डाणपूलच होणे गरजेचे आहे) परंतु एक संतुलित पर्यायी व्यवस्था मिळू शकेल असे वाटते. कस्तुरी कार्यालया पासून पोलीस स्टेशन पर्यंतचा गावातील महामार्ग सिक्स लेन्थ चा करण्यात येऊन, दोन्ही बाजूस पदाचारी मार्ग देखील तयार करणे अत्यावश्यक वाटते. उरुळी कांचन हद्दीतील महामार्गावरती अलंकार चौक, पोलीस स्टेशन, शिवकृपा कॉम्प्लेक्स, कस्तुरी मंगल कार्यालय आणि इरिगेशन चौकातील उपलब्ध यूटर्न किंवा क्रॉसिंग सेक्शन मुळे गावातील नागरिकांना सोयीनुसार पर्यायी रस्त्यांचा वापर करता येऊ शकेल.