एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप .
सचिन माथेफोड,पुणे
दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या डाळिंब बन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची माहिती हायस्कूलच्या प्राचार्य शमशाद कोतवाल यांनी दिली.
लोणी काळभोर येथे एंजल हायस्कूल व जुनियर कॉलेज इंग्रजी माध्यमाची जुनी शाळा आहे .या शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंत वर्ग पर्यंत विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेतात
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्काराची रुजवून होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम शाळेच्या वतीने राबवले जातात .शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना समाजऋण, मातृ ऋण, पितृऋण, गुरु ऋण या गुणांत मुक्त व्हावे लागते. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हायस्कूलच्या वतीने अन्नदान केले जाते तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना मदत केली जाते.
दौंड तालुक्यातील डाळिंब बंद प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या डाळिंब पण या ठिकाणी अनेक दिवसांपासून श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे, या ठिकाणी मुलांना मोफत वारकरी संप्रदायाचे शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण हि दिले जाते. तसेच मुलांना संपूर्ण पालन पोषण या शिक्षण संस्थेच्या वतीने केले जाते. यावेळी श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश लेकूळे महाराज, श्री विठ्ठल देवस्थानचे सचिव लक्ष्मण म्हस्के ,डाळिंब गावचे माजी उपसरपंच व दौंड तालुका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सर्जेराव म्हस्के ,गायक जालिंदर म्हस्के ,व राजेंद्र म्हस्के यावेळी उपस्थित होते.
ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री सोसायटीचे संचालक अविनाश शेलुकर, संस्थेच्या संचालिका परवीन इराणी मॅडम यांच्या प्रेरणेतून हायस्कूलमध्ये विविध उपक्रम केले जातात. एंजल हायस्कूलच्या प्राचार्या शमशाद कोतवाल, उपप्राचार्य झिमली लोध ,एंजल हायस्कूलचे व्यवस्थापक निलेश अडसूळ, एंजल हायस्कूल चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले आहे.