फुरसुंगीला चॅम्पीयन करंडक*
सचिन माथेफोड,पुणे
. जिल्हा परीषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डाएट)आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाटय स्पर्धा2024-25 या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ प्रसिद्ध अभिनेत्री निलम शिर्के यांचे हस्ते झाला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, डाएट चे प्राचार्य शेंडकर साहेब, डाएटचे बालकृष्ण वाटेकर साहेब, सुवर्णा तोरणे इ. मान्यवर उपस्थित होते या .स्पर्धेत *न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी विद्यालयाने या वर्षीचा पु ल देशपांडे चॅम्पियन करंडक* मिळविला.
१ )इंग्रजी नाटक ब्युटीफुल फेअरी
जिल्हयात प्रथम क्रमांक
सौ. पौर्णिमा मोरे-
दिग्दर्शन द्वितीय क्रमांक
२ )मराठी नाटक- वंदे मातरम जिल्हयात तिसरा क्रमांक
सौ वंदना जगदाळे
दिग्दर्शन तृतीय क्रमांक
३ ) मराठी नाटक – जंगल
श्री किरण सरोदे
उत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक
या स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले
उत्कृष्ट अभिनय पारितोषिक विद्यार्थी
इंग्रजी नाटक-प्रांजल वणवे, दिव्या चव्हाण, किर्ती कदम
मराठी नाटक – स्वरा वारे, आदेश सरोदे,
सर्वांचे संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी ‘ . स्पर्धेतील पु ल देशपांडे चॅम्पीयन करंडक पटकाविला.