आता हरण्याची भीती म्हणून सहकारात पक्षीय राजकारण केले सुरू – प्रशांत काळभोर
सचिन माथेफोड
आता हरण्याची भीती वाटू लागल्याने सहकारात पक्षीय राजकारण विरोधी पॅनेलने सुरू केलेले असून ज्यांना कारखान्याचे काहीही माहीत नाही असे उमेदवार काय कारखाना सुरू करणार आणि काय चालवणार असे वक्तव्य प्रशांत काळभोर यांनी केले आहे.आयोजित केलेल्या प्रेस मीटिंग मध्ये त माहिती देत होते की महाराष्ट्र केसरी ही पदवी फक्त कॉन्ट्रॅक्ट लाटण्यासाठीच यांनी घेतलेली असून कारखाना सुरू करण्याबाबत यांची काहीच योजना यांची नाही.तसेच अनेक राजकीय लोकांशी आम्ही बोललो आहे अशा खोट्या वल्गना हे लोक करत आहेत.तसेच हे जर खरे असेल तर मागील तेरा वर्षात यांना या गोष्टी का नाही सुचल्या केवळ आपले पाप लपविण्यासाठी यांना निवडणूक जिंकायची आहे व एकदा का पदावर आले की सर्व कॉन्ट्रॅक्ट घशात घालण्यासाठीच काम करायचे आहे त्यामुळे सुज्ञ मतदार यांनी योग्य माणसाला निवडून द्यावे असे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मत व्यक्त केले.