राजकीय

एवढा अनुभव आहे तर बारा वर्षात कारखाना का सुरू झाला नाही.- योगेश काळभोर


सचिन माथेफोड

आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार सरपंच योगेश काळभोर यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर हल्ला चढविला असून विरोधी पॅनल मधील नेत्यांना विचारणा करताना ते म्हणाले की आपल्याला एवढा अनुभव आहे तर कारखाना बंद कसा पडला आहे.मागील बारा वर्ष हा अनुभव का नाही वापरला.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की

यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काही लोक नांदेड येथे चालू असलेल्या कारखान्याचे उदाहरण देऊन यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड येथे चालू असलेल्या कारखान्याची अवस्था काय आहे हे सद्यस्थितीमध्ये कोणीही पाहिले नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना त्या ठिकाणची परिस्थिती दाखविण्यात येईल. शेतकऱ्यांच्या उसाला किती भाव दिला. शेतकऱ्यांची देणे किती आहेत. व कशा पद्धतीने कारखाना चालत आहे. हे लवकरच सर्वांसमोर येईल.  

Advertisement

ज्यावेळी यशवंत अखेरच्या घटका मोजत होता त्यावेळी हे सुद्धा संचालक मंडळात होते. त्यावेळी यशवंतला मदत झाली असती तर यशवंत बंद पडला नसता आणि आज हे लोक ज्यांच्या बरोबर उभे आहेत त्याच लोकांच्यावर यांचा विश्वास नव्हता म्हणून कोणीही यशवंतला त्यावेळी मदत केली नाही आणि आज हेच सगळे यशवंत बंद पाडायला कारणीभूत आहेत आणि आत्ता यशवंत सुरू करण्याच्या मोठमोठ्या बाता मारत आहेत कसा सुरू करणार कोण मदत करणार किती करणार आणि कशी करणार याबद्दल एक चकार शब्दही हे लोक बोलत नाहीत फक्त अनुभव आहे एवढेच बोलतात अनुभव होता तर त्यावेळी अनुभव कुठे गेला. आता तुमचा अनुभव तुमच्याजवळ ठेवा आता आम्हाला अनुभव जास्त आला आहे पण आमच्या सर्व शेतकऱ्यांची फी जास्त गेलेली आहे त्यामुळे यशवंत वर झालेले उपकार खूप आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!