आळंदी म्हातोबा गावाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
सचिन माथेफोड,पुणे
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील रूपेश हनुमंत शिवरकर यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२४ देण्यात आला. मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील हॉटेललेमन ट्री प्रिमियममध्ये पार पडला. बेस्ट कस्टमायजेशन एक्सलन्स इन प्लॅस्टिक कॉम्पोनन्ट अॅवार्ड या कॅटेगरीमध्ये रूपेश शिवरकर व गणेश जयवंत जाधव यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन दोघांना मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मायक्रोटेक पॉलिमर्स या कंपनीची स्थापना रूपेश शिवरकर व गणेश जाधव यांनी भागीदारीमध्ये सन २०१९ मध्ये केली. सदर कंपनी प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग व्यावसायामध्ये काम करते. भारतामध्ये एकूण २३ ग्राहकांना प्लास्टिकची उत्पादने त्यांच्या गरजेनुसार पुरवली जातात. तसेच भारताबाहेर देखील मायक्रोटेक पॉलिमर्सने व्यावसाय करण्यास सुरू करून भारताच्या निर्यातीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे.