श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयाचा १०० % निकाल
सचिन माथेफोड,पुणे
Advertisement
आळंदी म्हातोबा येथील श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी बोर्डचा निकाल प्रतिवर्षी प्रमाणे १०० टक्के लागलेला आहे.या शाळेतील एकूण ४९ विद्यार्थी परीक्षेस बसलेली होती.यावर्षी देखील मुलींनीच या परीक्षेत बाजी मारलेली असून प्रथम क्रमांक अन्वेशा नितीन भोंडवे (८४.६०),द्वितीय क्रमांक प्रदीप सुरेश माने (८०.८०),तृतीय क्रमांक आदित्य जालिंदर जवळकर (७८.२०) असे प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बाजारे यांनी माहिती दिली.ग्रामस्थांच्या व विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.